दिव्यांग शिक्षक, कर्मचारी यांना विधानसभा निवडणूक कामातून सूट मिळावी

 

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेची मागणी

लांजा (प्रतिनिधी) दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी काढल्यास त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामातून दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना पूर्णपणे वगळण्यात यावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे .

 

 

याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी यांना सादर करण्यात आले आहे .या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी काढल्यानंतर त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मागच्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी काढल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला होता. त्यामुळे ही बाब लक्षात घेता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक कामातून दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना पूर्णपणे वगळण्यात यावे, आणि तशा प्रकारे शासकीय आदेशात सूट मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे यांनी केली आहे .
शासनाने दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना निवडणूक कामात होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन व त्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून त्यांना या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.