कणकवली : महामार्गावर सर्विस रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कणकवली शहर शाखेतील इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असणारे सुबोध तुकाराम कुरतडकर ( वय ५० रा. करुळ, मधलीवाडी) यांचे अपघाती निधन झाले.
दरम्यान कणकवलीतील म्हस्कर हॉस्पिटल कडील शेट्ये मेडिकलचे मालक श्री. शेट्ये हे त्यांच्या पाठोपाठ गाडीने येताना कुडतरकर हे पडलेल्या स्थितीत दिसले. त्यांना तातडीने आपल्या गाडीतून त्यांनी कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.
सुबोध हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पाश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.












