आ. योगेश कदमांच्या प्रयत्नांना यश सरकारने अटी केल्या शिथिल; मंत्रिमंडळात निर्णय
खेड (प्रतिनिधी) कृषीविद्यापीठासाठी जमीन देणान्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय १० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना कृषी विद्यापीठाचे प्रकल्पग्रस्त दाखल्यावर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
दापोलीमधील कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पास्तानी त्यांच्या मागण्या आ. योगेश कदम यांच्याकडे मांडल्या होत्या. त्या मागण्या सरकारने मान्य करत विद्यापीठ भरतीमधील अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे आ. योगेश कदम यांची जामगे येथे कोकण कृषी विद्यापीठातील शेकडो प्रकल्पग्रस्तांनी भेट पेऊन आभार मानले .
कोकण कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये कर्मचारी भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय घेण्यात आला होता. परंतु या भरती प्रक्रियेत टाकण्यात आलेल्या अटी शर्थी यामुळे विद्यापीठाला जागा देणाऱ्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता धूसर होती. त्यामुळे दापोली तालुक्यातील टेटवली, इनाम पांगरी, दापोली रखी, वाकवली गावावळे असोड या भागातील विद्यापीठाला जागा दिलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आ. योगेश कदम यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. आ. कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. त्यांनी दापोली तालुक्यात सुमारे ३०० हून अधिक प्रकल्पग्रस्तांवर कसा अन्याय होत आहे ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर १० रोजी मंत्रीमंडळ बैठकीत सन २०२२ मधील पद भरती मधील अटी व शर्तीमध्ये मला आणताना भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी विशेष निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत प्रकल्पग्रस्तांनी केले आहे.
प्रकल्पग्रस्तांचे विद्यापीठात नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल
कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पासाठी स्थापनेपासून आजपर्यंत दापोली तालुक्यातील टेटवली, इनाम पांगरी, दापोली रुखो, वाकवली गावातले असोंड या भागातील शेवयांच्या जमिनी सरकारने संपादित कल्या होत्या. परंतु प्रकल्पग्रस्त असताना देखील त्यांना ना दाखले मिळत होते व ज्यांना दाखले मिळाले त्यांना विद्यापीठात नोकऱ्या मिळत नव्हत्या. परंतु आ. योगेश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने आता विद्यापीठात पदभरती होताना भूमिपुत्रांना सहज संधी मिळेल अशा प्रकारचा शासन निर्णय झाला आहे. त्याबद्दल प्रकल्पग्रस्त समाधानी असून आता सरकारने ज्यांच्याकडे दाखले नाहीत यांना लवकरात लवकर दाखले देऊन विद्यापीठात पात्रतेनुसार नोकरीत सामावून घ्यावे, अशी अपेक्षा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते नीलेश शेठ यांनी व्यक्त केली आहे.
विद्यापीठात नवीन पदे
कोकण कृषी विद्यापीठ उभे करण्यासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना विद्यापीठात आता नोकऱ्या मिळू शकणार आहेत. तसेच कोकण कृषी विद्यापीठात पदव्युत्तर उच्च शिक्षण सुरू करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू असून त्यामुळे अनेक नवीन पदे विद्यापीठात निर्माण होतील, असा विश्वास यावेळी आ. योगेश कदम यांनी व्यक्त केला.










