रत्नागिरी ः प्रतिनिधी l रेल्वे प्रवसादरम्यान प्रवाशाचा मोबाईल लांबवणार्या अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1.10 ते पहाटे 5.45 वा. कालावधीत रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर घडली होती.
याप्रकरणी पंकज रतिलाल पटेल यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवार 13 ऑक्टोबर रोजी ते संपर्कक्रांती मडगाव एक्सप्रेसने प्रवास करत होते. प्रवास करताना रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर त्यांची गाडी आली असताना अज्ञाताने त्यांचा 38 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला.









