रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि ओम फिजिओथेरपी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑक्टोबर रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन

 

रत्नागिरी, – रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि ओम फिजिओथेरपी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्त रत्नागिरीतील खेडशी येथे मोफत सांधेदुखी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत ओम फिजिओथेरपी क्लिनिक, खेडशी येथे होणार आहे.

या शिबिरात उपस्थित असलेल्या सर्व रुग्णांची मोफत बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) चाचणी केली जाणार आहे. विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी हाडांची ताकद तपासण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका ओळखता येईल. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय सल्ला दिला जाणार असून, काही औषधांची मोफत वाटप देखील केली जाईल. शिवाय, आवश्यकता असल्यास, सांध्यांसाठी सपोर्ट करणारे पट्टे अत्यंत सवलतीच्या दरात विकत घेण्याची सुविधा दिली जाईल.

शिबिरात अनुभवी फिजिओथेरपिस्ट डॉ. संदीप करे (PT) आणि डॉ. स्वप्ना करे (MD Ayu) रुग्णांना पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी आणि इतर हाड व स्नायू दुखण्यांच्या तक्रारींवर उपचार देणार आहेत. फिजिओथेरपी आणि आयुर्वेद उपचार पद्धतींचा संयुक्त लाभ रुग्णांना मिळणार आहे.

शिबिर विनामूल्य आहे आणि नोंदणीची कोणतीही आवश्यकता नाही. मात्र, उपस्थित रुग्णांसाठी अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे सेवा अधिक सुरळीत मिळू शकेल. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी, 8459006670 किंवा 9225803745 या क्रमांकावर संपर्क साधावा.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे अध्यक्ष रोटे. हिराकांत साळवी यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हाडांची ताकद तपासण्यासाठी बोन मिनरल टेस्ट करून फ्रॅक्चरचा धोका टाळावा, असेही त्यांनी नमूद केले.