खेड (प्रतिनिधी) खेड शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका-जुगार अड्डड्यांसह गावठी हातभट्टीच्या
दारूधंद्यांवर धाडी टाकण्याचे येथील पोलिसांचे सत्र सुरूच असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील मटण-मच्छी मार्केटनजीक असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीरपणे ‘गुडगुडीचा व्यवसाय तेजीत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. गुडगुडी व्यवसाय चालवणाऱ्या . व्यावसायिकावर
कारवाईची मागणी केली जात आहे.
शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या मटका-जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या जात असल्या तरी व्यावसायिक छुप्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मटका-जुगार अड्ड्यांसह दारूधंद्यांवर धाडी टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे.











