बुधवळे मळेशेतवाडी घरावर वीज कोसळली 

 

 

वीज उपकरणे जळून नुकसान : माजी उपसभापती राजु परुळेकर यांनी केली पाहाणी 

मालवण | प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील परतीच्या पावसाची बरसात विजांच्या कडकडाटासह सुरू आहे. काही ठिकाणी नुकसानीच्या घटना घडत आहेत. बुधवळे मळेशेतवाडी येथील सुलोचना गोविंद जाधव यांच्या घरावर वीज [lightning] कोसळल्याने घरातील वीज उपकरणे [electrical appliances] जळून मोठे नुकसान झाले आहे.

 

वीज पडून घरातील इलेक्ट्रिक साहित्य [electrical items], फॅन [fan], फ्रिज [fridge], टीव्ही [TV] जळून गेले. जाधव कुटुंबियांचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

सदर घटनेची माहिती मिळताच माजी उपसभापती [former vice-chairperson] राजू परुळेकर यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. प्रशासनास नुकसानीची माहिती दिली. तसेच, जाधव कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.