खेड येथे युवा सैनिकांचा मेळावा
खेड(प्रतिनिधी)माझ्या विजयात सिंहाचा वाटा युवक युवती यांचा असेल. मी युवा आमदार आहे. युवा सैनिकांची फौज माझ्या पाठीशी आहे. युवा सेना ही काही जण स्वतःची जहागीरदारी समजतात परंतु संपूर्ण महाराष्ट्रात माझ्यासारख्या असंख्य युवा सैनिकांनी मेहनत घेतली त्यामुळे युवा सेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली. असे प्रतिपादन आ. योगेश कदम यांनी केले.
खेड येथे पार पडलेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. श्रेया कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, चंद्रकांत कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, युवा सेना तालुकाप्रमुख मिलींद काते यांच्यासह पदाधिकारी आणि युवा सैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मूलभूत सुविधा देण्यापेक्षा जास्त महत्व युवकांना रोजगार देण्यासाठी काम करणे ही मी माझी जबाबदारी समजतो. आमचे सरकार आल्यानंतर ना. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कोका कोला कंपनीला लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये जागा मिळवून दिली. माझ्या दापोली विधानसभा मतदार संघात मंडणगड तालुक्यातील एक हजार एकर क्षेत्रात औद्योगिक क्षेत्र सरकार कडून मंजूर केले आहे. मुली, महिलांच्या हाताला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे यासाठी मी काम करतो आहे. लघु उद्योग उभे करण्याच्या दृष्टीने मी मतदारसंघात काम करत आहे. माझ्या मतदार संघातील तरुण रोजगारासाठी मुंबई – पुण्यात जाऊ नये यासाठी मी विशेष प्रयत्नशील आहेत.
आम्ही समाजाचे राजकारण न करता सर्वांना समान वागणूक देऊन युवकांनी राजकारण न करता युवकांनी समाजकारण केले पाहिजे. राजकारण केवळ निवडणुकीत कराव. केलेली कामे जनते पर्यंत पोहोचवा हे काम व्यर्थ जाणार नाही. मी तरुण असल्याने तरुणांचे नेतृत्व करतो. केवळ निवडणुकीसाठी आम्ही युवकांचा वापर करून घेत नाही तर नियमित आपण एकत्र येऊ युवक – युवतींच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करु. असे आश्वासन या मेळाव्यात बोलताना आ.कदम यांनी दिले










