तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवी व इतर ग्रामदेवतांचा 23 व 24 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा

गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी व इतर देवतांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम बुधवार दिनांक 23 व गुरुवार दिनांक 24 रोजी विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे.

 

 

तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी ही भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून प्रसिध्द आहे.दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात बुधवार दि.23 रोजी दुपारी रोजी दुपारी 1 ते 3 सहाण ते श्री सुकाईदेवी मंदिर पर्यंत मिरवणूक,दुपारी 3 वाजता मूर्ती स्नान व इतर विधी त्यानंतर मूर्ती निद्रावस्थेत ठेवणे, गुरुवार दि.24 रोजी सकाळी 8 वाजता ग्रामदेवता श्री सुकाई देवी व इतर देवता मूर्तींची प्राणप्रतिष्ठा,पूजा अर्चा आरती तिर्थप्रसाद,दुपारी 1 वा.महाप्रसाद, संध्याकाळी 7 ते 9 वा.हरिपाठ, रात्री 9 ते 10 वा.भजन,रात्री 10.30 वा शक्ती तुरा डबलबारी सामना पार पडणार आहे.तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सुकाई देवी ग्रामदेवता देवस्थान तळवली कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी ग्रामदेवता कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.