राजिवडा व बेलबाग येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई 

 

 

 

रत्नागिरी : प्रतिनिधी :शहरातील राजिवडा व बेलबाग येथे आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगून असलेल्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 23 ऑक्टोबर रोजी 6.20 ते 7 वा. कालावधीत करण्यात आली.

 

 

 

 

एक महिला आणि विनायक सनगरे (54,रा. मधला फगरवठार,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील महिला विना परवाना गावठी हातभट्टीची 5 लिटर दारु राजीवडा समुद्र किनारी तर विनायक सनगरे हा बेलबाग येथील एका घराच्या समोरील भागात 1 हजार रुपयांची 10 लिटर दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.