कणकवली;
श्रावण विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत भा.ज.पा. जेष्ठ पदाधिकारी कमलाकांत तथा बाळासाहेब कुबल यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मालवण तालुका सहकार अधिकारी श्री. हिर्लेकर यांनी काम पहिले, त्यांना सहकार्य श्री. मोरे यांनी केले.
यावेळी विद्यमान संचालक मंडळातील दुर्गाप्रसाद तुळपुळे, विनोद कुबल, अरुण लाड, विजय गवळी, विनायक बाईत, दुलजी परब, सौ. चव्हाण, प्रशांत परब, सदाशिव श्रावणकर तसेच संस्था सेक्रेटरी श्री. कदम, श्रीमती परब आदी उपस्थित होते.
निवड वृत समजताच भाजपा प्रदेश सचिव श्री दत्ता सामंत, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी जि.प. सदस्य महेंद्र चव्हाण यांनी श्री. कुबल यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे विशेष अभिनंदन केले.











