सावंतवाडी पोलिसांची कारवाई
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी पोलिसांनी शुक्रवारी गार्डनच्यामागे गांजा सेवन करताना एका युवकाला पकडले. हर्षल उर्फ हरी सुहास पार्सेकर ( वय २९ रा. कारिवडे ) असे त्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची तक्रार पोलीस हवालदार मनोज मारुती राऊत यांनी केली. तर ही कारवाई पोलीस हवालदार दर्शन सावंत, अनिल धुरी , गलोले, देठे यांनी केली.












