आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती
वैभववाडी | प्रतिनिधी : आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
… यांनी प्रवेश केला
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये तेजस इंदुलकर, विकास घागरे, लक्ष्मण सुर्वे, सुभाष गावडे, पांडुरंग घागरे, गौरांग सुर्वे, आकाराम कांबळे, शरद घागरे, रघुनाथ घागरे, सिताराम मांडवकर, पांडुरंग शिंगरे, संजीवनी घागरे, सागर इंदूलकर आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा प्रवेश तिरवडे तर्फ सौंदळ येथे पार पडला.
यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे तसेच BJP चे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












