देवगड एस्टी स्थानक परिसरातील चप्पल दुकान फोडले, एसटीच्या आवारात दुकान फोडी झाल्याने एसटीच्या सिक्युरिटी वर प्रश्नचिन्ह

 

 

चोरट्यांनी मागील पत्रा काढून चोरी करण्याचा केला प्रयत्न

मात्र हाती काही लागले नसल्याने दुकानातील चप्पल दिली बाहेर फेकून

देवगड l प्रतिनिधी :देवगड एस्टी स्थानक परिसरातील चप्पल दुकानात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केल्याने खळबळ उडाली असून ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. हा एसटीच्या आतल्या परिसरात असलेल्या स्टॉल आहे. यामुळे एसटीच्या सिक्युरिटीच्या सिस्टीम वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी बाजूच्या पर्यटन मार्गदर्शन केंद्राचा गाळ्याच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे एसटीचे सुरक्षारक्षक नेमके काय करतात हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

देवगड एस्टी स्थानक परिसरात प्रमिला प्रभाकर दहिबांवकर यांच्या मालकीचे श्री समर्थकृपा हे चप्पल दुकान असून रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता दुकान बंद करून त्या दहिबांव येथे घरी गेल्या.सोमवारी सकाळी ६.४५ वा.नेहमीप्रमाणे त्यांनी येवून दुकान उघडले यावेळी दुकानाच्या मागील बाजुचा पत्रा त्यांना कोपèयातून उघडलेला दिसला.तर त्या पत्र्याचा उघडलेल्या बाजुकडे दुकानात आत ठेवलेले चप्पल चोरट्यांनी काढून बाहेर फेकल्याचे निदर्शनास आले.त्यांनी या घटनेबाबत देवगड पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर पो.हे.कॉ.उदय शिरगांवकर यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली व माहिती केली.तसेच याबाबत देवगड पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सांगीतले.दरम्यान दहिबांवकर यांच्या दुकानात रक्कम ठेवलेली नव्हती मात्र दुकानाचा मागील पत्रा पुर्णत: काढण्यात चोरट्याला यश न आल्याने त्यांनी पत्रा काढण्याचा प्रयत्न करून आतील मिळेल त्या चप्पल बाहेर काढून त्या तेथेच टाकून पळ काढला.

 

पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या तसेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असलेल्या परिसरातच लागोपाठ चोरीची ही दुसरी घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणेकडूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने चोरटे मोकाट सुटत असून पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. एसटी प्रशासनाने या प्रकरणी हात वर केले असून आमचे कॅमेरे बंद असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी एसटी प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे