रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील चांदोर तळीवाडी परिसरात बेकायदेशिरपणे देशी-विदेशी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणार्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वा. करण्यात आला असून 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महेंद्र मारुती चव्हाण (39) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल प्रकाश झोरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,रविवारी रात्री संशयित हा आपल्या ताब्यात विना परवाना देशी-विदेशी 9 हजार 770 रुपयांची दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.










