साळवी स्टॉप झोपडपट्टी येथील बेकायदेशीर दारु विक्रीवर कारवाई

 

रत्नागिरी । प्रतिनिधी : शहरातील साळवी झोपडपट्टी येथील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगूाणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.15 वा. सुमारस करण्यात आली.

 

 

 

सुरज शांताराम कांबळे (27,रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल पंकज पडेलकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा रविवारी दुपारी आपल्या ताब्यात 850 रुपयांची 8 लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.