उबाठा या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी नाव ठेवावे

 

भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांची घणाघाती टीका 

दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करुन सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही

१००जागांवर सुद्धा उबाथाचे उमेदवार नाहीत

राहुल गांधी उद्धव ठाकरेंचा फोनही घेत नाही

कणकवली :शिवसेना उबाठा या पक्षाने आपलं नाव बदलून कचरा पार्टी ठेवावं, कारण काँग्रेसने (Congress) त्यांच्यावर सातत्याने कचरा (waste) केला आहे. त्यामुळे उबाठा नावही आता त्यांना शोभत नाही, अशी घणाघाती टीका भाजप (BJP) प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी केली. ते कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी (residence) पत्रकारांशी बोलत होते.

राणे म्हणाले, “पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाचा कचरा केला. नंतर दिल्लीश्वरांच्या (Delhi leaders) समोर मुजरा (salute) करून सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही. संजय राऊत बेडकासारखा फुगून ‘आम्ही सेंचुरी मारणार’ असं सांगत आहेत. मात्र सेंचुरी (century) बोलणाऱ्या संजय राऊतला शंभर जागा लढवाव्या लागतात, तेव्हाच स्ट्राईक रेट (strike rate) शंभर टक्के च्या आसपास होतो. शंभर सोडा, हे आता ८८ जागांवर आहेत, आणि काही दिवसांत हे ८८ च्या खाली जातील. आणि तेव्हा त्यांना स्वतःच्या पक्षाला गुंडाळावं लागेल.”

“उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी युतीत असतानाचे (alliance) दिवस आठवावेत आणि भाजपसोबतचा इतिहास तपासावा. तेव्हा कसा मान-सन्मान होता! आता असा कचरा झाला आहे की, ‘८८ जागा घ्यायच्या तर घ्या, नाहीतर बाजूला व्हा.’ राहुल गांधींचं (Rahul Gandhi) दर्शन उद्धव ठाकरेंना दूरच झालं आहे, कारण राहुल गांधींच्या डाव्या-उजव्या (left-right) सोबत उद्धव ठाकरे भागवतात. आता राहुल गांधी ठाकरेंचा फोनही घेत नाहीत. २०१९ मध्ये सत्ता स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) फोन घेतला नाही. आज राहुल गांधी ठाकरेंचे फोन घेत नाहीत, याला नियतीचा खेळ म्हणतात. उगाच छाती ताणून दाखवू नका; काँग्रेसने उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला योग्य पद्धतीने लायकी दाखवलेली आहे.”

“एअर बस (Airbus) प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गुजरातला (Gujarat) गेला होता, आताचा तो विषय नाहीय. संजय राऊतला पत्रकार परिषदेत चपलांनी मारलं पाहिजे होतं, कारण संजय राऊत सकाळी एक बोलतात आणि संध्याकाळी त्याचं विसरतात. सुपारी बाज हे वक्तव्य संजय राऊत ठाकरेंबद्दल बोलले असतील, कारण उद्धव ठाकरेंच्या घरातील सर्व वस्तू वसुलीच्या (extortion) पैशातून येतात,” असं भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी हल्लाबोल केला.