वन विभाग, प्राणीमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात
खेड (प्रतिनिधी) शहरातील जगबुडी नदी किनारी पोत्रिक मोहल्ला येथे बंदर रोड परिसरात सायंकाळी ६ च्या सुमारास १३ फुटाचा महाकाय अजगर आढळून आला. प्राणीमित्रांना बोलावून तेथील नागरिकांनी अजगराला सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी मदत केली.
खेड बंदर परिसरातील पौत्रिक मोहल्ला येथील सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक सुमारे तेरा फूट लांबीचा अजगर दिसला. त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क केला वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर या महाकाय अजगराला वन्यजीव बचाव पथकाने कोणतीही इजा न पोहोचवता ताब्यात घेतलं व त्याला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या घटनेनंतर शहरात या अजगराच्या आकाराबाबत चर्चा सुरू होत्या.











