वनविभागाच्या कर्मचाऱ्याने पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागाच्या आवारात चक्क धामण जातीचा साप आढळून आला. तेथे उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तो निदर्शनास आला. याच वेळी या ठिकाणी उपस्थित असलेले वन विभागाच्या जलद कृती दलाचे कर्मचारी बबन रेडकर यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.












