काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
सतेज पटलांना धक्का ; राजेश क्षीरसागर यांना मोठी ताकद
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत त्यांनी गुरुवारी ३१ ऑक्टोंबर रोजी प्रवेश केला. जाधव यांचा पाठिंबा आता महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना मिळणार आहे.
आमदार जाधव यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती; मात्र त्यांची उमेदवारी नाकारली गेली. काँग्रेसकडून पहिल्यांदा राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, पण नगरसेवकांच्या विरोधामुळे उमेदवारी मधुरिमाराजे छत्रपती यांना देण्यात आली. त्यांनी नुकताच अर्ज दाखल केला असताना, जाधव यांची अनुपस्थिती त्यांच्या असंतोषाचे संकेत देत होती.
२०१९ मध्ये दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवलेल्या जयश्री जाधव यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का ठरलेला आहे. यामुळे कोल्हापूर काँग्रेस मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे










