विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले पोलिसांचे शिरोडा बाजारपेठेत रूट मार्च…

 

वेंगुर्ले : दाजी नाईक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी शनिवारी वेंगुर्ले पोलिसांकडून शिरोडा बाजारपेठेत रूट मार्च करण्यात आले. शिरोडा बाजारपेठ सह मुख्य ठिकाणी पोलिसांनी हे संचलन केले.

 

 

 

वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रूट मार्च करीता सी आय एस एफ जवान-४५ एस एस बी जवान -४४, सावंतवाडी पोलीस ठाणे अधिकारी- ०१, अंमलदार- ३, वेंगुर्ला पोलीस ठाणे अधिकारी- ०२, अंमलदार-१० सहभागी झाले होते.