दोडामार्ग :- सुहास देसाई : दोडामार्ग तालुक्यातील जनतेने कायम आपल्याला साथ दिली आहे त्यामुळं दीपावलीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग बाजारपेठेत साटेली भेडशी बाजारपेठ व्यापारी व व्यावसायिक यांची भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वरचे दर्शन घेतले यावेळी रिक्षा टेंपो चालक अन्य व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
काल रात्री उशिरपर्यंत दोडामार्ग येथे दीपक केसरकर यांनी बाजारपेठेतील सर्व दुकान व्यवसायिक, भाजीविक्रेते, फेरीवाले यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजू निंबाळकर, तिलकांचन गवस, भगवान गवस, मायकल लोबो, सत्यवान गवस, रमाकांत जाधव, योगेश महाले, नंदू टोपले, गोपाळ गवस, गुरूदास सावंत, महिला सानवी गवस, चेतना गडेकर, सविता नाईक, प्राची चव्हाण, संध्या प्रसादी, आदी मानयुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उवस्थित होते.
दिवाळीच्या सणाला सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या दरवर्षी दोडामार्ग तालुक्यात दिवाळी साठी पहिल्यांदा आलों यापूर्वी सावंतवाडी शहरात दिवाळी ला शुभेच्छा देण्यासाठी फिरायचो मात्र आता दोडामार्ग, बांदा भेडशी या ठीकाणी दरवर्षी येईन आणि सर्व दुकान व्यापारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा ईश्वर त्यांच्या सर्व इच्छा परिपूर्ण करो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे केसरकर यावेळी म्हणाले.












