खेड(प्रतिनिधी) एकीकडे महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरू असताना दुसरीकडे ग्राहकांना वीजबिले उशिराने देवून नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे ऑक्टोबर महिन्यातील वीजबिले ग्राहकांना उशिरानेच देण्यात आली. यामुळे अतिरिक्त भार आकारण्यात आला.
सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्राहक मेटाकुटीस आलेले असतानाच त्यात आता नव्या समस्येची भर पडली आहे. तारीख उलटून गेल्यानंतरच वीजबिले प्राप्त झाल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. यामुळे वीजदेयके पुढील तारखेला भरणा करण्यासाठी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. ऑक्टोबर अखेरीस करण्यासाठी ग्राहकांना प्राप्त झालेल्या वीजबिलांपोटी अतिरिक्त अधिभार महावितरणने आकारला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर उर्मट उत्तरे देण्यात आल्याचेही ग्राहकांचे म्हणणे आहे. महावितरणकडून बेजबाबदारपणे दिल्या जाणाऱ्या उत्तरांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.










