रत्नागिरीत नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण

 

माखजन :  रत्नागिरी तालुक्यातील नवनियुक्त शिक्षण सेवकांचे ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

 

 

हे प्रशिक्षण रत्नागिरीतील रा.भा.शिर्के हायस्कुल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होत आहे.
या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून मानसी चव्हाण (पटवर्धन हायस्कुल),विष्णू पवार (केंद्र झरे वाडी),समृद्धी गोणबरे( निवेडी वरची),रामदास चव्हाण (ओरी नं १),श्वेता कवीतके(पं.स.रत्नागिरी),खलिदा जमादार(पं.स रत्नागिरी),अमर घाडगे (केंद्र शिरगाव),मानसी मोने (वेतोशी नं २),अनिल शेट्ये (न.प.क्र.१५)सुधीर शिंदे(कृ.चि. आगाशे विद्यामंदीर),संगीता पवार(पं.स रत्नागिरी),श्रीम.देवयानी पवार(पं.स रत्नागिरी), गोविंद तारवे (केंद्र खानू),सुहास वाडेकर(नाखरे नं १) विभा बाणे (तोणदे),संतोष गार्डी(अ.के.देसाई हायस्कुल रत्नागिरी)दिगंबर घवाळी(नेवरे देवपाट)अश्विनी काणे(पं.स रत्नागिरी),दीपाली जंगम(पं.स रत्नागिरी),आदी काम पहात आहेत.
या प्रशिक्षणा दरम्यान नवीन शैक्षणिक धोरण या विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.या प्रशिक्षणात सुमारे १५० शिक्षणसेवक सहभागी झाले आहेत