ग्रामस्थांमध्ये भिंतीचे वातावरण…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी: तालुक्यातील शेळेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २८ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून ती दुरंगी होत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना घडलेल्या भानामतीच्या प्रकारामुळे गावात एकच गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत उघडण्यासाठी गेले असता कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या पायरीवर संशयास्पद वस्तू आढळून आल्या. सरपंच पदाच्या उमेदवार यांच्या फोटोवर लिंबू ठेवून टाचण्या मारून तसेच गंडे दोरे,अंगारा पायपुसणीवर टाकलेला आढळून आला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे. सध्या निवडणुकीमध्ये थेट लढत होत आहे.या पार्श्वभूमीवर घडलेल्या प्रकाराचा दोन्ही गटांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारामुळे गावातील शांतता भंग होत असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनाने घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.












