ओटवणे येथील किल्ले बनविणे स्पर्धेत शिवस्वराज्य ग्रुप प्रथम

.इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्याच्या एकापेक्षा एक कलाकृती ठरल्या लक्षवेदी

.ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे मांडव फातर येथील सती देवी कला क्रीडा मंडळ आणि संकल्प सेवासंघ आयोजित भव्य अशा किल्ले बनविणे स्पर्धेत शिव स्वराज्य ग्रुप भटवाडी यांनी बनविलेली तोरणा गडाच्या प्रतिकृतिला प्रथम क्रमांक, गावठणवाडी मीत्रमंडळाने बनविलेल्या प्रतापगड प्रतिकृतीला द्वितीय तर जय जिजाऊ ग्रुप मांडवफातरवाडी ने बनविलेल्या पद्मदुर्ग किल्याला तृतीय क्रमांक मिळाला तर सात मावळे ग्रुप गवळीवाडी सिंधुदुर्ग किल्ला, रामकृष्ण हरि ग्रुप करमळगाळू, मल्हार गड शिव प्रेमी ग्रुप मांडव फातर वाडी यांनी साकारलेल्या या किल्ले प्रतिकृती सुद्धा आकर्षण ठरल्या.

. आपल्या गौरवशाली इतिहासाची छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या पराक्रमाची कर्तृत्वाची गाथा सांगणारे गड किल्ले आजही अभेद्द आहेत आणि हा इतिहास आजच्या युवा पिढीला कळावा आपल्या गड किल्ल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे आपला धगधगता इतिहास या युवा पिढीला कळावा या उद्देशाने

सती देवी कला क्रीडा मंडळ आणि ‘संकल्प सेवासंघ’ यांनी ही किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित केली. या किल्ले बनविणे स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक उपस्थित होते .यावेळी बोलताना अनेक उपक्रम राबवित जन जागृती करणाऱ्या या मंडळाचे कौतुक करताना मंडळाने केलेले काम खरंच कौतुकास्पद असून एका सुंदर हेतूने आयोजित या स्पर्धेमुळे ऐतिहासिक किल्ल्याचे महत्व अबाधित राहण्यास मदत होईल. आणि यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सती कला व क्रीडा मंडळ आणि संकल्प सेवा संघ यांचे कौतुक केले

यावेळी व्यासपीठावर सती देवी कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष राजाराम वर्णेकर, प्रकाश पनासे, दशरथ गावकर, दशरथ शृंगारे, महेश चव्हाण, सुतार गुरुजी, संतोष तावडे, उमेश म्हापसेकर, दादा वारंग, पूजा तावडे, दीपिका वर्णेकर आदी उपस्थित होते.

यावेळी समील नाईक यांनी गड व किल्ला बनविण्याच्या प्रक्रियेतून किल्ल्यांचा प्रकार, उंची, इतिहास, बांधकाम, तटबंदी, माची, खंदक, दरवाजा प्रकार, बुरुज, तलाव, इमारती या समृद्ध वारशाबद्दलची माहिती दिली . दशरथ शृंगारे आणि महेश चव्हाण यांनी ही दुर्ग, गड, किल्ले यांचा महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नव्या पिढीला महाराष्ट्राच्या या गड किल्ल्यांची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची माहिती व्हावी तसेच दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा आताच्या पिढीमध्ये रुजावी व त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे कौतुक केले.

तर राजाराम वर्णेकर यांनी ही सर्वांचे कौतुक केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना ३००१ रुपये, २००१ रुपये, १००१ रुपये देवून तर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणुन दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोंकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, कार्याध्यक्ष समील नाईक, विघ्नेश मेस्त्री, शीतल नाईक यांनी केले. हे किल्ले प्रदर्शन पुढील १५ दिवस सर्वांसाठी खुले राहील. प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रथमेश पनासे यांनी तर आभार प्रथमेश सावंत यांनी मानलेत.