शासनातर्फे होणार मोफत ऑपरेशन आणि उपचार
मसुरे | झुंजार पेडणेकर
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मेंदूचे विकार प्रवर्गातील मुलांच्या तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा महिला बाल रुग्णालय कुडाळ येथे करण्यात आले.
सदर शिबीर हे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
एम एम आर हॉस्पिटल, ठाणे , मुंबई येथील तज्ज्ञ आणि टीम उपस्थित होते.
या शिबीरा मध्ये एकूण 50 लाभार्थी उपस्थित होते. शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सामंजस्य करार झालेल्या रूग्णालयात मोफत उपचार करणेत येणार आहेत.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील वैद्यकिय अधीक्षक डॉ संजय वाळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेलंग, इनचार्ज सिस्टर श्रीम गावित व श्रीम गोसावी आणि स्टाफ यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिरास श्री निलेश गावडे, (DAM), डॉ रोहन साळुंखे, (DPM), श्री राजेश पारधी, (DPS) श्री विश्वनाथ राव, श्रीम एकता वराडकर आणि आरबीएसके टीम, डी ई आय सी टीम उपस्थित होते.










