तळवडे येथे महायुतीच्या मेळाव्याला उदंड प्रतिसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी : बाळासाहेबांनी स्थापन केलेली महायुती पुन्हा एकत्रित आणण्याचं काम एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केल. या दोघांची जोडी राज्यात विधायक काम करत आहेत. अनेक विकासकामे युती सरकारने केली. ते पाहून अजित पवार देखील सरकारमध्ये सहभागी झाले. लोकहिताच काम करणार सरकार राज्यात पुन्हा आणण्यासाठी महायुतीचे उमेदवारांना विजयी करा असे आवाहन दीपक केसरकर यांनी केलं.
तर खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची साथ असल्याने आपण विजयाचा चौकार मारणारचं असा विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. तळवडे येथील महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.ते म्हणाले, पाच वर्षात सत्वीशशे कोटींची काम मी केलीत. महायुतीच्या लोकप्रतिनिधीनी या विकासात साथ दिली. राज्यात
शिंदे-फडणवीस यांच्या जोडीने केलेलं काम बघून अजित पवार देखील सरकारमध्ये आले. विकास कामांचा धडाका आमच्या सरकारने लावला.
जर्मनीशी करार करत पहिली बॅच तिथे पाठवली. चांगल्या पगाराची नोकरी तिथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. माझ्यावर मोठ्या पदांच्या जबाबदाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दिल्या. त्याचा फायदा कोकणातील लोकांसाठी जनतेला न्याय देण्यासाठी मी केला. शिक्षणमंत्री व मराठी भाषा मंत्री म्हणून धोरणात्मक निर्णय घेतले असे ते म्हणाले.
तळवडे येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, महिला आघाडी प्रमुख ॲड. निता सावंत, तालुका प्रमुख बबन राणे, रविंद्र मडगावकर, पंकज पेडणेकर, प्रमोद गावडे, विद्याधर परब, सुरज परब आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












