महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी भव्य महिला सभा देवगड व पडेल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या सभेसाठी जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, भाजपा प्रवासी प्रभारी महिला मोर्चा संयोजिका श्रीमती सुलक्षणा प्रमोद सावंत आणि भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. उषःकला केळुस्कर व पडेल मंडल तालुकाध्यक्ष संजना आळवे यांनी भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी, महिला आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच महिला बूथ अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
देवगड मधील कार्यक्रम तारी कंपाऊंड, हॉटेल प्रपंच शेजारी, देवगड येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. तर पडेल मधील कार्यक्रम ओम गणेश कॉम्प्लेक्स पडेल कॅन्टीन येथे तीन वाजता होणार आहे.












