गुन्हेगारी कमी असलेला व शांत सिंधुदुर्ग जिल्हा. 

जनतेने पोलिसांची संपर्क साधून मदत घ्यावी.-     अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम.

सिंधुनगरी : बाळ खडपकर 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक शांत व संयमी. आहेत. कायद्याचे चांगले ज्ञान असलेला हा जिल्हा आहे. जिल्हावासीय जनतेला जिल्हा पोलीस दलाचे जनतेला कायम सहकार्य राहील. जनतेनेही पोलीस दलाचा संपर्क वाढवावा व पोलिसांची मदत घ्यावी. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यास पोलिसांना सहकार्य करावे अशी पहिली प्रतिक्रिया नव्याने रुजू झालेल्या सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी दिली. मुख्यालय पत्रकार संघाच्या पत्रकारानी त्यांची शुक्रवारी भेट घेतली होती.

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने आज सिंधुदुर्ग कन्या आणि नूतन अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांची भेट घेतली या वेळी त्या बोलत होत्या.या वेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर,जिल्हा पत्रकार संघाचे सचिव बाळ खडपकर,मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव दत्तप्रसाद वालावलकर,संदीप गावडे,नंदकुमार आयरे,संजय वालावलकर,विनोद दळवी,मनोज वारंग,विनोद परब आदी उपस्थित होते.या वेळी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचे पुष्प गुच्छ देऊ स्वागत करण्यात आले.

सिंधुदुर्ग हा शांत आणि कायद्याचं ज्ञान असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात गुन्हेगारी खूप कमी आहे. ही तशीच राहावी असा आपला प्रयत्न राहील असे सांगतानाच आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी निवडणुकाही कायदा व सुव्यवस्था कायम राखून संपन्न होतील असा आपला प्रयत्न राहील अशी पहिली प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी दिली.