सातोसे माऊली मंदिरात उद्यापासून हरीनाम सप्ताह सोहळा

 

दोन दिवस विविध कार्यक्रम

बांदा (प्रतिनिधी) :     सातोसे येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानचा हरीनाम सप्ताह मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त मंदिरात दोन विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजता हरीनाम सप्ताहाची विधिवत सुरुवात होईल.

दुपारी १२ ते ४ दरम्यान देऊळवाडी ग्रमस्थांचे भजन, सायंकाळी ४ ते ८ अत्रेवाडी ग्रामस्थांचे भजन, रात्री ८ ते १० श्री सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी यांचा अभंग, नाट्यगीत, भावगीत आणि भक्तिगीतांचा सुरेल कार्यक्रम होईल. यात संगीत विशारद केतकी सावंत व नितीन धामापुरकर यांचे गायन होईल. त्यांना संचालक निलेश मेस्त्री हार्मोनियम तर किशोर सावंत व नीरज भोसले तबला साथसंगत करतील.  रात्री १० ते २ दरम्यान रेखवाडी आणि लिंगेवाडी ग्रामस्थांचे भजन, मध्यरात्री २ ते ६ वाजेपर्यंत दुर्गावाडी, आडारीवाडी, दत्तवाडी आणि टेमवाडी ग्रामस्थांचे भजन होईल. बुधवारी सकाळी ६ ते दुपारी १२ दरम्यान सप्ताह समाप्ती पर्यंत देऊळवाडी ग्रमस्थांचे भजन होईल. सप्ताह समाप्तीनंतर कौल आणि पावणी कार्यक्रम होईल. दिंडी श्री देव कुळकार मंदिराकडून मंगळवारी रात्री १२ वाजता निघाल्यानंतर सकाळी ६ वाजता श्री देवी माऊली मंदिरात पोहचणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान उप समिती व समस्त सातोसे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.