दापोली | प्रतिनिधी (रुपेश वाईकर) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून दापोली मतदार संघात महायुतीच्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट व आरपीआय पक्षाच्या दापोली मतदार संघातील नेत्यांनी एकत्र येत दापोली शिवसेना कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तसेच निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटनहीं आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आरपीआय जिल्हाप्रमुख प्रितम रुके, दादा मर्चडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाऊ ईदाते, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजय बिरवटकर, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय सावंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, आरपीआय तालुका अध्यक्ष राहुल यादव, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या
जिल्हाध्यक्षा सौ. साधना बोत्रे, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ. रमा बेलोसे, विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप
सुर्वे, शरप्रमुख प्रसाद रेळेकर,संदिप केळकर, नितीन मयेकर, स्वरूप महाजन, निलेश शेठ आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करिता झालेला पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार योगेशदादा कदम म्हणाले की, माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होत आहेत मात्र पुढील काळात २१०० रुपये देण्यात येतील. यासाठी ४२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२००० रुपये दिले वाजनतून जात होते त्याची मर्यादा वाढून आता १५ हजार रुपये केली जाणार आहे. तसेच एम.एस.पी.ची हमी देण्याचे वचन देण्यात आले आहे. प्रत्येकास अन्न आणि निवारामहाराष्ट्रातील प्रत्येक गरीब कुटुंबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन देण्यात आले आहे.
वृद्ध पेन्शन योजना पेन्शन धारकांना आधी प्रतिमहा १५०० रुपये दिले जात होते, ते आता २१०० केलें जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिरराज्यात पुढील काळात
दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.२५ लाख रोजगार निर्मिती राज्यामध्ये २५ हजार रोजगार निर्मिती करण्यात येणार असून, १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये प्रशिक्षणातून विद्या वेतन देण्याचे वचन देण्यात आले आहे. ४५००० हजार गावात पाणंद रस्तेराज्यातील ग्रामीण भागात ४५ हजार गावांमध्ये पाणंद ही योजना प्रामुख्याने राबवली जाणार असून १ कि. मी. रस्त्यासाठी २४ लाख रुपये मंजूर केले जाणार आहेत. अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेत प्रामुख्याने अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचा समावेश असतो. त्यामुळे त्यांचे मानधन १२०० हजारहून असता १५०० केले जाणार असून त्यांना विमा संरक्षण देण्याचे वचन देण्यात आले आहे.वीज बिलात ३० टक्के कपात आपली महत्वाची गरज असलेल्या वीज बिलात यापुढे ३० टक्के कपात केली जाणार असूनसौर ऊर्जेचा वापर करण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे. सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र २०२९ महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची वज्रमूठ मजबूत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राची तिजोरी महायुती सरकाने लाडकी बहीण योजना सुरू करून लुटली, अशी टीका केली होती. मात्र आम्ही राबविलेली योजना बघून २ हजार ऐवजी आम्ही ३ हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीने केली, याला काय म्हणावं मग आता महाराष्ट्र डबघाईला जाणार नाही का असा सवाल करीत याचा खुलासा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावा, असा टोलाही आमदार योगेशदादा कदम यांनी विरोधकांना लगावला. व महायुतीचा जाहीरनामा हा सर्वसमावेशक असल्याचे जाहीर केले. दापोली मतदार संघातील व्हिजन हे महायुतीच्या नेत्यांना सोबत घेऊन सर्वपक्षीय ठरवले जाईल, असा खुलासा करत, सुमारे ३ हजार पाचशे कोटींपेक्षा जास्त निधी दापोली मतदार संघात महायुतीच्या सरकारमार्फत आणण्यात आम्हाला यश आले आहे, असे सांगत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व आरपीआय पक्षाचे नेते नाः रामदास आठवले यांचे जाहीर आभार मानले,










