मालवण येथे साधला संवाद : डॉक्टर, वकील, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, पुरोहित, पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार, शेतकरी, बागायतदार उपस्थित
मालवण | प्रतिनिधी : कोकणी जनतेवर माझे विशेष प्रेम आहे. यां भागाच्या विकास हाच माझा ध्यास राहिला. येथे सुबत्ता येत असताना, दरडोई उत्पन्नही वाढत आहे. हे अधिक वाढले पाहिजे यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. रोजगार निर्मितीचे विविध प्रकल्प, स्किल डेव्हलपमेंट सेंटर होत आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही माझे अधिक प्रयत्न सुरु आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करायचा आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.
यां भागाचे प्रतिनिधित्व करत खासदार म्हणून संसदेत काम करत असताना केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळणार आहे. सोबतच राज्यातील महायुती सरकारचे प्रतिनिधी म्हणून याठिकाणी विजयी होणारे आमदार निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर यांच्या साथीने सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध होईल. असा ठाम विश्वास खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला. विकासाचे व्हिजन त्यांनी मांडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेबद्दल त्यांची असलेली आपुलकी, प्रेम उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभवले.
मालवण येथे उद्योजक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक, पुरोहित, पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार, बागायतदार व अन्य उपस्थित नागरिक यांच्यासोबत खा. नारायण राणे यांनी संवाद साधला. यावेळी जेष्ठ डॉ. शशिकांत झांटये, ऍड. समिर गवाणकर, माजी प्राचार्य डॉ. श्रीपाद गिरसागर, ऍड. हेमेंद्र गोवेकर, विलास हरमलकर, डॉ. हरीश परुळेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर, अनिल मालवणकर, डॉ. अविनाश झांटये, डॉ. शिल्पा झांटये, डॉ. राहुल पंतवालावलकर, विकी तोरसकर, जॉन नरोना, प्रसन्न मयेकर, बर्वे सर, विजय केनवडेकर, नितीन तायशेटये, नाना पारकर, परशुराम पाटकर, सौ. स्वप्नाली नेरुरकर, सौं. स्मृती कांदळगांवकर, शर्वरी पाटकर, राजन सरमळकर, दादा वेंगुर्लेकर यांसह अन्य उपस्थित होते. तसेच महायुती पदाधिकारी अशोक सावंत, महेश कांदळगांवकर, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, दीपक पाटकर, बबन शिंदे, राजु वराडकर, अन्वेषा आचरेकर, किसन मांजरेकर, पंकज सादये, जगदीश गांवकर, पुजा करलकर, महानंदा खानोलकर, ममता वराडकर, किशोर खानोलकर, राजु सावंत यांसह अन्य महायुती पदाधिकारीही उपस्थित होते.
गेल्या तीन दशकापासून नारायण राणे यांनी या भागाचा मोठया प्रमाणात विकास केला. मात्र गेल्या काही वर्षात समस्या वाढल्या आहेत. रस्ते खड्डेमय बनले मात्र राणे साहेब त्या समस्या निश्चितच सोडवतील. त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी गेल्या काही वर्षात सातत्याने यां भागात जनतेशी संपर्क ठेवून काम केले. विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. यावेळी निलेश राणेच आमदार होतील आणि विकासाला अधिक चालना मिळेल असा विश्वास अनेक उपस्थितांनी व्यक्त केला.
शिष्यवृत्तीत वाढ. झाली राणे साहेबांचे आभार
शालेय स्तरावर पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती धारक यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती रक्कम अतिशय अल्प होती. काही महिन्यांपूर्वी टोपीवाला हायस्कुल येथील बर्वे यां विद्यार्थ्याने याबाबत खा. राणे यांचे लक्ष वेधले होते. तो प्रश्न शासन दरबारीं मांडून राज्यातील सर्व विद्यार्थी यांची शिष्यवृत्ती रक्कम वाढवण्यात राणे साहेबांनी महत्वाची भुमिका बजावली. असे सांगत त्या विद्यार्थ्याने विशेष आभार मानले.











