सौ. निलमताई राणे ; विकास आणखी वेगाने करण्यासाठी नितेश राणे पुन्हा आमदार झाले पाहिजेत
देवगड येथे महायुतीचे उमेदवार l नितेश राणे यांची प्रचार सभा संपन्न
देवगड : आमदार नितेश राणे हे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारे उमेदवार आहेत. रात्रंदिवस त्यांनी आपल्या भागाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. ज्याप्रमाणे खा. नारायण राणे यांनी कोकणच्या विकासाचा ध्यास घेतला होता, त्याची आठवण आमदार नितेश राणे यांचे काम पाहिल्यावर येते. हा विकास आणखी वेगाने करण्यासाठी आमदार नितेश राणे पुन्हा आमदार झाले पाहिजेत, असे मत सौ. निलमताई राणे यांनी व्यक्त केले.
जिजाऊ महिला बचत गट चळवळीच्या अध्यक्ष सौ. निलमताई राणे यांनी देवगड येथे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचार सभेत बोलत असताना हे विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सौ. निलमताई राणे यांनी महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांचे नाव न घेता टीका केली. “आमच्याच लोकांपैकी काही लोक आमच्याविरोधात उभे राहतात, पण हे उमेदवार कायमच पडतात आणि त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी आपली आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.
सिंधुदुर्गातील महायुतीच्या तीनही जागा जिंकणे गरजेचे आहे. प्रचार सभा देवगडची असली, तरी आपले नातेवाईक सिंधुदुर्गात आहेत, त्यांना महायुतीला मत देण्यासाठी विनंती करा,” असे आवाहन निलमताई राणे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी प्रवासी प्रभारी महिला मोर्चा संयोजक सौ. सुलक्षणा सावंत यांनी महायुतीने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला पाठिंबा दिला. गोवा राज्यातील ‘गृह आधार’ चा उल्लेख केला. ही योजना तेरा वर्षांपासून चालू असून अजून बंद झालेली नाही, यामुळे अशी योजना महिलांना गरजेची आहे.
गोव्याचे जसे सौंदर्य आहे, तसेच देवगडचेही आहे. आमदार नितेश राणे यांनी देवगडच्या पर्यटनासाठी केलेले प्रयत्न या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत, असे सांगून त्यांनी आमदार नितेश राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. विकास करणारे आमदार या मतदारसंघाला लाभले आहेत; त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून आणायचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सुमेधा पाताडे यांनीही आपले विचार या सभेत मांडले.
यावेळी व्यासपीठावर महिला मोर्चाच्या देवगड मंडळ अध्यक्ष उष:कला केळुसकर, महिला मोर्चाच्या पदाधिकारी प्रियांका साळस्कर, प्राजक्ता घाडी, सावी लोके, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, देवगड-जामसांडे नगरपंचायतीतील भाजपाच्या सर्व नगरसेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नगरसेविका तन्वी चांदोसकर यांनी केले.










