गोळवण कुमामे येथे भाजपाचा उबाठाला धक्का
मालवण | प्रतिनिधी : गोळवण कुमामे येथील जिल्हापरिषद माजी महिला व बालकल्याण सभापती सपना पावसकर यांसह त्यांचे पती ग्रामपंचायत माजी सदस्य उबाठा कार्यकर्ते वासुदेव पावसकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थित हा पक्षप्रवेश झाला.
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात आपण जोमाने काम करू. असा विश्वास प्रवेशकर्ते पावसकर यांनी व्यक्त केला. पावसकर हे पूर्वी पासून कट्टर राणे समर्थक अशी ओळख प्राप्त कार्यकर्ते आहेत. काही वर्षा पूर्वी ते गैरसमाजातून उबाठा गटात गेले. मात्र गावच्या गतिमान विकासासाठी राणे साहेब आणि महायुती शिवाय पर्याय नाही. हे जाणून त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे भाजपात स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, कुडाळ मालवण संयोजक बाबा परब, सरपंच सुभाष लाड, माजी सभापती राजु प्रभुदेसाई, आशिष हडकर, विष्णु लाड, संजय पाताडे, शरद मांजरेकर, भाई चिरमुले, सत्यविजय पालव, गुरुनाथ पालव, पप्या माने, नंदू माने, गणपत माने यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.












