आली लग्न घटी, शुभमंगल सावधानsss

 

कोकणात तुळशी विवाहाची धामधूम सुरू !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– कोकणात तुळशीच्या लग्नाची आणि पावसाने ओढ दिल्याने भात कापणीची त्यातच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने, डोअर टू डोअर स्थानिक कार्यकर्त्यांसह सर्व उमेदवारांच्या प्रचाराची धामधूम मोठ्या उत्साहात सुरू आहे. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवसापासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत वाड्या-वाड्यावर विवाहाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. काही ठिकाणी पारंपारिक वृंदावन मातीने तयार करून तर, नव्या युगातील सिमेंटच्या तुळशी वृंदावनाला रंगरंगोटी करण्याची लगबग पहावयास मिळते ..बाजारपेठेमध्ये विवाह सोहळ्याचा मेनू, उधळणीसाठी चुरमुरे, उसाची वाढे झेंडूची फुले, आवळे- चिंचा, शेंगदाणे- खडके लाडू, बालुशाहीचे स्टॉल जागोजागी थाटले असून त्याला खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहावयास मिळतो. पंचक्रोशीतील श्री विठ्ठल- रखुमाई मंदिरात पूजाअर्चा, भजने, डबलबारीचे कार्यक्रम होणार आहेत त्यामुळे पंचक्रोशीत चैतन्याचे वार वारे वाहत आहेत—