रत्नागिरी । प्रतिनिधी : तालुक्यातील साखरतर मोहल्ला येथे एकाला चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवार 10 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वा. सुमारास घडली.
सज्जाद सद्दाम होडेकर, अमर नाझीम मुल्ला (दोन्ही रा.साखरतर मोहल्ला,रत्नागिरी) आणि इतर दोन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात जुहेर मोहम्मद हनिफ पटेल (28, रा. राजीवडा बुडीये मस्जिदजवळ,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री तो मावस बहिणीला साखरतर येथील घरी सोडून परतत असताना सज्जाद होडेकरने फिर्यादीला तू इकडे का आलास, कोठून आलास असे विचारुन हातातील लोखंडी फायटरने डोक्यात मारहाण केली. तर अमर मुल्लानेही त्याला हातांनी मारहाण करुन इतर दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्ररकणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











