कै. दादा आचरेकर स्मृती चषक ; सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित एक लाख पारितोषिक रक्कमेची जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा
मालवण | प्रतिनिधी : मत्स्य व पर्यटन उद्योजक सतीश आचरेकर मित्रमंडळ यांच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठया पारितोषिक रक्कमेच्या प्रकाश झोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ विजेता ठरला. तर व्हीएम स्पोर्ट्स मालवणला उपविजेते ठरले. स्पर्धेतील विजेत्या संघास १ लाख १००१ व कै. दादा आचरेकर स्मृती चषक २०२३ तर उपविजेत्या संघास ५१ हजार १ व चषक देऊन गौरविण्यात आले.दरम्यान, स्पर्धेत ब्लॅक टायगर कुडाळ तृतीय, मकरेश्वर मालवण चतुर्थ यांना अनुक्रमे २१,००१ व ११,००१ व अशी पारितोषिक व चषक तसेच मॅन ऑफ दि सिरीज राहुल काळप यांच्यासह अन्य वैयक्तिक भव्यदिव्य परितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित खेळाडू सहभागी झाले. पाच दिवस क्रिकेटचा हा महसंग्राम सुरू होता. सर्वाधिक पारितोषिक रक्कमेच्या या भव्यदिव्य आयोजनातील स्पर्धेचे सर्वांनीच विशेष कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रक्कमेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख झाला. सामाजिक कार्य असो अथवा कोणतीही स्पर्धा ही भव्यदिव्य आयोजनात झाली पाहिजे. खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले पाहिजे. या हेतूने नेहमीच प्रयत्नशील राहणाऱ्या सतीश आचरेकर यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेच्या भव्यदिव्य व नियोजनबद्धतेचे क्रीडा प्रेमी यांनी कौतुक केले.
यावेळी स्पर्धेचे सर्वेसर्वा तथा उद्योजक सतीश आचरेकर, रोहन आचरेकर, आंनद आचरेकर यांसह प्रमुख उपस्थिती दिलीप आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मोहन वराडकर, पूजा सरकारे, विकी चोपडेकर, बबन रेडकर, निलेश वेरणेकर, ओंकार मोरे, अजिंक्य बोगले, सर्वेश पावसकर, एजास मुल्ला, बाबा जोशी, वैभव मयेकर यासह सतीश आचरेकर मित्रमंडळ उपस्थित होते.
स्पर्धेत समालोचक म्हणून सुनील करवडकर, गोपी मालवणकर, राहुल केळुसकर, समीर चव्हाण, प्रशांत गावडे यांनी काम पाहिले. तर पंच व साहाय्य म्हणून गुणेश हडकर, योगेश मेस्त्री, सागर जोशी, विश्वास आचरेकर, जॉयल भुतेलो, शैलेश मलये, एजास मुल्ला, बाबा जोशी, प्रथमेश गवंडी, मुन्ना फाटक, रोहन वाळके व अन्य सहकारी यांचे स्पर्धा यशस्वी आयोजनात मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले. प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी ठरली. असे सांगत सतीश आचरेकर यांनी सर्वांचे आभार मानले.