‘जिज्ञासा’ च्या लघुपट निर्मिती शिबिराला प्रतिसाद

Response to the short film making camp of ‘Jijyasa’

रत्नागिरी : जिज्ञासा थिएटर्स तर्फे दिनांक 2 मे 2023 ते चार मे 2023 अखेर मोफत लघुपट निर्मिती माहिती शिबिराचे आयोजन अ.के.देसाई हायस्कूल येथे करण्यात आले होते. या माहिती शिबिरात रत्नागिरीतील 14 दर्दी शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराला रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी आणि हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुहासजी भोळे यांचे मार्गदर्शन लाभले होते. लघुपट म्हणजे काय? तो कसा बनवला जातो? त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते? त्यातील तांत्रिक बाजू काय काय असतात? त्याचे वितरण कसे केले जाते? इत्यादी गोष्टींची इत्यंभूत माहिती सुहासजींनी शिबिरार्थींना दिली. कथेवरून पटकथा कशी लिहिली जाते? त्यावरून स्टोरी बोर्ड कसा बनवला जातो? फ्रेमिंग म्हणजे काय? शॉट म्हणजे काय? इत्यादी गोष्टी प्रात्यक्षिकासह शिबिरार्थींकडून करून घेतल्या. यातील जवळपास सर्वच शिबिरार्थींनी सुहास भोळे यांच्या आगामी लघुपटात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. शिबीर संपताना सर्व शिबिरार्थींनी आपापले मनोगत व्यक्त केले. लघुपटासाठी लागणारी विविध साधने, संगणक प्रणाली इत्यादी गोष्टी शिबिरार्थींना मोफत शिकवण्याची तयारी सुहासजींनी दाखवली. लवकरच सुहास भोळे यांची अशाच आशयाची मोफत शिबिरे राजापूर आणि महाड येथे आयोजित करण्यात आली आहेत.