महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना बहुमताने निवडून आणणार- सौ वर्षा प्रभुदेसाई

 

लांजा (प्रतिनिधी) राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना बहुमताने निवडून आणणार असल्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ वर्षा प्रभुदेसाई यांनी सांगितले.
राजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार किरण (भैया) सामंत हे निवडणूकीला सामोरे जात आहेत. लांजा व राजापूर तालुक्याच्या विकासाचे दृष्टीने किरण सामंत यांना निवडून देण्यासाठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते झटून कामाला लागलो आहोत. प्रचार जोरदार सुरू असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे.

 

 

 

म्हणूनच आपले आपले प्रश्न सोडविणे करिता विधानसभेमध्ये आपला हक्कचा माणूस असावा म्हणून श्री किरण (भैया) सामंत यांना भरगोस मतांनी विजयी करणे आवश्यक आहे. आम्ही सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते झटून काम करत असून
कोणत्याही परिस्थितीत किरण सामंत यांना निवडून आणणारच, असा विश्वास सौ. वर्षा राजेंद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.