आंगणेवाडी श्री भराडी देवी मंदिर सुवर्ण कलश वर्धापनदिन 17 नोव्हेंबर पासून !

मसूरे | झुंजार पेडणेकर : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर 20 वा सुवर्ण कलश वर्धापनदिन निमित्त 17 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 रोजी सकाळी 8 वा दुर्गा होम, दुपारी 12 वाजता सुवर्ण कलश व ध्वज पूजा, दुपारी 12. 30 वाजता आरती, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 7 वाजता आचरा देऊळवाडा यांचे दिंडी भजन, रात्री 9 वाजता डबलबारी भजन सामना बुवा अजित गोसावी ( तिवरे गोसावी वाडी ) विरुद्ध बुवा रुपेश देशमुख (खालापूर -रायगड ) या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता गोवर्धन भजन मंडळ वडखोल बुवा रुपेंद्र परब यांचे भजन, रात्री 10 वाजता दत्तमाऊली दशावतार मंडळ सिंधुदुर्ग यांचे “श्री विठ्ठल बिरदेव भेट” हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.