खेड पंचायत समितीत मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट

खेड(प्रतिनिधी) येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात गुरुवार .७ रोजी मतदार जगृतीसाठी सेल्फी पॉइंट चे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तिकिरण पुजार यांच्याहस्ते झाले.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून २० रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये सर्व मतदारांनी आपले कर्तव्य बजावणे आवश्यक असून याबाबत सर्वच शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून खेड पंचायत समितीमध्ये गुरुवार .७ रोजी मतदान जन जागृती सेल्फी पॉइंट उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, परशुराम इचुर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी खेड मधील सर्व मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.