८ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
सावंतवाडी | प्रतिनिधी : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणारी क्रेट ( एम एच ०७ ए जे ९१९९ ) या गाडीचा सावंतवाडी पोलिसांनी गाडी चा पाठलाग करत कोलगाव येथे कारवाई केली. याप्रकरणी विराज लक्ष्मीकांत वाडकर, ( वय- २१ वर्षे, रा. कोलगाव चर्च जवळ सावंतवाडी ), अतोन लॉरेन्स रॉड्रिक्स,( रा. किनळे खालची वाडी, सावंतवाडी ), वीरेंद्र वासुदेव जाधव, ( रा. वाडा पडेल, देवगड ) तिघानाही ताब्यात घेतले. तसेच या कारवाईत ८ लाख ८३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. विधानसभा निवडणुक काळात कोलगाव गावी मारुती मंदिर जवळ रस्त्यावर सावंतवाडी येथे शुक्रवारी रात्री ३.४० वाजता ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पोलीस सावंतवाडी परिसरात तपासणी साठी फिरत असताना क्रेटा ( एम एच ०७ ए जे ९१९९ ) आली असता गाडीचा संशय आल्याने थांबविण्या साठी सांगितले गाडी न थांबविता चालकाने पलायन केले असता गाडीचा कुडाळ पर्यंत पाठलाग करत जाऊन कुडाळ येथून बस स्टॅन्ड जवळील ब्रिज खालून पुन्हा सावंतवाडीच्या दिशेने पाठलाग करत गाडीचा तपस करण्यात आला. गाडीची तपासणी केली असता त्यात महागड्या ब्रँडची दारू असल्याचे समोर आले. गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले.
सदर कारवाई पोलीस अधिकारी अमोल चव्हाण यांच्या मार्ग दर्शनाखाली वालावलकर, दिगविजय यांनी केली.









