कल्पना कॉलेज लांजा मध्ये २५ नोव्हेंबर रोजी संविधान निबंध स्पर्धेचे आयोजन

 

लांजा (प्रतिनिधी) शहरातील कल्पना कॉलेज लांजा मध्ये संविधान दिनानिमित्त सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१:०० ते ०२:३० या वेळेत, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील (१० वी ते १२ वी) विद्यार्थ्यांसाठी या संविधान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

 

या स्पर्धेसाठी भारतीय संविधानाचे प्रास्ताविक, भारतीय संविधान आणि महिलांचे अधिकार, आपले संविधानिक अधिकार,संविधान नसते तर..? हे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांक- रोख १००० आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- रोख ७०० आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- रोख ५०० आणि सन्मानचिन्ह अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी श्री.पवार ७७७६०८००१४; श्री .तेंडुलकर ९६५३१२८१८ यांचेशी संपर्क साधायचा आहे.