भांबेड गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचा त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सव संपन्न

 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचा त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. पारंपारिक पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमेला देवीला विविध रूप लावून अलंकार व पुष्पहार आणि सजविले होते. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाईने सजविले होते.

 

 

 

देवीला रूपे लागल्यानंतर ओटी भरणे, नवस फेडणे इत्यादी कार्यक्रम साजरे झाले. रात्री प्रथेप्रमाणे टिपूर तयार करून विशिष्ट पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात गावकरी तरुण मुलांकडून नाचविले जातात. टिपूर नाचविल्यानंतर मानकरी व गावकरी मंडळी यांनी प्रदक्षिणा घालून दीपोत्सव साजरा केला. यामध्ये दीपमाळ, मंदिर परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले.
रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम नमन मोर्डे या गावातील संपन्न झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री महालक्ष्मी देवीचे मानकरी व श्री महालक्ष्मी मंडळ भांबेड चे सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.