Container overturned at Kankavali Halwal Fata The driver was seriously injured

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल.!
अवघड वळण ठरतंय मृत्यूचा सापळा.!
कणकवली : मुंबईहून गोव्याच्या दिशेने थर्माकोलची वाहतूक करणारा GA 05 T 6578 हा कणकवली गड नदी पुलावर असणाऱ्या अवघड वळणावर पलटी झाला. प्रथमतः चालक एकटाच असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र टेम्पोच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे
अपघातातील कंटेनर चालकाला गंभीर दुखापत झाली असून चालक चालकाला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कणकवली गडनदी पुलावरील अवघड वळणावर आज शुक्रवारी दुपारी ३:५५ वाजण्याचा सुमारास घडला.
अपघात होताच क्षणी तेथे घटनास्थळी दखल असलेल्या नागरिकांनी तसेच ऋषिकेश नारायण कोरडे ( रा. कणकवली ) यांनी जखमी चालकाला कंटेनर मधून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव, श्री. उबाळे, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार पांडुरंग पांढरे, हवालदार श्री. मासाळ, होमगार्ड सुमित वारंग, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्रि, नितीन म्हापणकर आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.











