खेड वाचनालयातर्फे दिवाळी अंकाचे प्रदर्शन

 

खेड (प्रतिनिधी) येथील नगर वाचनालयातर्फे दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील विविध प्रकाशकांतर्फे काढण्यात आलेले दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत.

या विविध दिवाळी अंकाचे वाचन वाचकांनी करावे. हा या प्रदर्शना मागील हेतू आहे. जास्तीत जास्त वाचकांनी वाचनालयात येऊन हे दिवाळी अंक घेऊन जाऊन वाचावेत, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष बाळाराम खेडेकर यांनी केले. प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे सचिव सुधीर देवळेकर व माजी प्राचार्य डॉ. सारंग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य गोविंद राठोड खजिनदार संतोष जेथे व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.