ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे येथील जनता पार्टीच्या लोटेमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपले राजीनाम्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे यांना पाठविले असून विधानसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच भारतीय जनता पार्टीला पर्यायाने महायुतीला मोठा दणका दिला आहे.
गुहागर मतदार संघाच्या २०२४च्या निवडणुकीसाठी महायुतीच्यावतीने शिवसेना शिंदे गटाचे राजेश बेंडल, महाविकास आघाडीच्यावतीने उबाठा शिवसेनेचे भास्कर जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी, तर रासपचे प्रमोद आंब्रे यांच्याशिवाय अन्य दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे कोणाही एका उमेदवाराला लक्षणीय मताधिक्य घेऊन विजय मिळविता येईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही आणि त्यातच मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच अचानक आपले राजीनाम्याचे पत्र तालुकाध्यक्षांकडे पाठवले आहे. यामध्ये लोटेचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे सचिन सुभाष चाळके, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संकेत हुमणे, तालुका चिटणीस मंगेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश आंबेडे, माजी सरपंच प्राजक्ता हुमणे, असगणीचे माजी सरपंच अनंत नायनाक, धामणदेवी बूथ अध्यक्ष संदेश खेराडे, लोटे बूथ अध्यक्ष गणेश गोवळकर, धामणदेवी ११४चे बूथ अध्यक्ष संदीप साळवी इत्यादींसह १३८ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले राजीनाम्याचे पत्र भाजप तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे यांच्याकडे पाठविले आहे.
याबाबत विचारले असता, या कार्यकर्त्यांनी, पक्षातील अंतर्गत मतभेद आणि चढाओढ आम्हाला अस्वस्थ करते. या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आम्ही राजीनामे देत आहोत, असे सांगितले.







