महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा. काणे स्मारकाच्या प्रथम वर्धापन दिनाला ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर रहाणार उपस्थित

Mahamahopadhyay Bharat Ratna Pvt. Veteran poet Ashok Naigaonkar will be present at the first anniversary of the Kane Memorial

दापोली | प्रतिनिधी : महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा. काणे यांची दि. ०७ मे ही जयंती. तसेच महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा. काणे स्मारकाची स्थापनाही ०७ मे २०२२ रोजी दापोली तालुक्यातील जालगांव येथे करण्यात आली. या स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन आणि महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा. काणे यांच्या जयंतीनिमित्ताने विशेष आयोजन दि. ०८ मे रोजी जालगांव येथे करण्यात आले आहे.

या निमित्त सकाळी दहा वाजता भारतरत्न पां.वा.काणे यांच्या जन्मगावी परशुराम येथील जन्मघराला आणि मूळगावी मुरडे येथील जि.प. प्राथमिक शाळेला अभिवादन त्यानंतर दापोली ए.जी. हायस्कूल या शाळेला अभिवादन करून जालगाव येथील स्मारकामध्ये सोमवार ०८ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्धापनदिनाचे कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर हे उपस्थित रहाणार असून त्यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जालगांवचे नवनिर्वाचित सरपंच अक्षय फाटक, दापोली अर्बन बँकेवर बिनविरोध निवडून आलेले जयवंत जालगांवकर आणि पद्मश्री दादा इदाते यांच्या विशेष सत्काराचे आयोजन महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा. काणे स्मारकाच्या मागील बाजूस असलेल्या आम्रपालीच्या आमराईत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाकरिता तमाम नागरिकानी उपस्थित रहावे आणि खुसखुशीत आणि कसदार विचारांची मेजवानी घ्यावी असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.