जनतेचा मिळतं असलेला पाठिंबा निलेश राणे यांचा विजय बहुमताने निश्चित करणारा : खा. नारायण राणे

धामापूर येथे गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांशी साधला संवाद

निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

मालवण | प्रतिनिधी : कोकणात 35 वर्षे काम करत असताना येथील जनतेने भरभरून प्रेम दिले. राजकारणात मिळालेली पदे सन्मान हा यां जनतेने दिला. येथील जनतेची जेवढी सेवा करेन तेवढी कमीच आहे. जनतेचे ऋण फेडू शकणार नाही. मात्र आता आनंद एका गोष्टीचा आहे, जे धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी पहिली आमदार निवडणुक लढवली आणि जनतेच्या आशीर्वादाने आमदार झालो. आता तीच निशाणी घेऊन निलेश राणे निवडणुक लढवत आहे. सर्वच ठिकाणी जनतेचा मिळतं असलेला पाठिंबा निलेश राणे यांचा विजय बहुमताने निश्चित करणारा ठरेलं. असा विश्वास खा. नारायण राणे यांनी धामापूर येथे बोलताना व्यक्त केला.

जिल्हा अधिक समृद्ध करायचा आहे. जनतेचे दरडोई उत्पन्न आणखी वाढले पाहिजे. पर्यटन, रोजगार यात वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक गावात ग्रामस्थांना अपेक्षित विकास साध्य करण्यासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खा. राणे यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधकांचा समाचारही खा. राणे यांनी खास शैलीत घेतला. दहा वर्षात येथील आमदाराने काही केले नाही. जी काही विकासकामे झाली त्यात भ्रष्टाचार केला. मात्र दर्जेदार कामे केली नाहीत त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट केले जावे हीच भुमिका राहणार आहे. ग्रामस्थांना अपेक्षित गाव विकास हेच निलेश राणे यांचेही धोरण असल्याचे खा. नारायण राणे म्हणाले.

धामपूर येथील गावभेट दौऱ्यात खा. नारायण राणे यांनी हॉटेल मराठा येथे आयोजित बैठकीत ग्रामस्थांशी संवाद साधला. अनेक जेष्ठ ग्रामस्थांची आपुलकीने विचारपूस केली. माझ्या आवडत्या गावांपैकी धामापूर हा गाव असल्याचे सांगितले. तसेच आज प्रचाराची सांगता धामापूर गावातून होत असताना ग्रामस्थांनी निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देणारच हा व्यक्त केलेला विश्वास प्रचाराचा शेवट गोड करणारा ठरला. असे खा. राणे म्हणाले.

यावेळी महेश धामापूरकर यांनी खा. नारायण राणे यांनी गावात केलेल्या विकासकामांचा लेखाजोगा मांडला. निलेश राणे यांच्या माध्यमातूनही गावात विकासनिधी प्राप्त झाला असून पुढेही प्राप्त होणार हा विश्वास व्यक्त केला.

यावेळी धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, संदीप कुरतडकर, माजी सभापती राजु परब, धामपूर ग्राप सदस्य प्रशांत गावडे, स्वप्नील नाईक, अस्मिता पोफळे, तेजस्विनी धामापूरकर, साक्षी नाईक यांसह महेश परब, महेश धामपूरकर, प्रताप चव्हाण, माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, लक्ष्मण परब, अभिषेक भोसले, अशोक थवी, प्रवीण परब, सिद्धेश परब, भालचंद्र परब, बाबू तोरसेकर, तुषार धामापूरकर, अविनाश निकम यांसह पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. निलेश राणे यांना मोठे मताधिक्य गावातून देणारच हा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.